तुम्हीही हा 'लाफिंग बॉय' मीम वापरलाय? चौथीत शाळा सुटलेल्या अरुण कुमारची कहाणी डोळ्यात पाणी आणेल!

Vinayan

हा मीम सगळ्यांनीच वापरला, पण मागची गोष्ट माहितेय?

सोशल मीडियावर आपण सगळ्यांनीच या खळखळून हसणाऱ्या मुलाचा मीम अनेकदा वापरला आहे; पण या हसण्यामागे लपलेली गोष्ट तुम्हाला भावूक करेल.

Laughing Boy Arun Kumar

|

Sakal

चौथीतच सुटली शाळा, क्लीनर म्हणून काम

या व्हायरल 'लाफिंग बॉय'चे नाव अरुण कुमार असून घरच्या परिस्थितीमुळे त्याला चौथीतच शाळा सोडावी लागली; पोटापाण्यासाठी त्याने ट्रक क्लीनर म्हणून काम सुरू केले.

Laughing Boy Arun Kumar

|

Sakal

चहा पिताना काढलेला व्हिडिओ ठरला व्हायरल

चहा पिताना एका ट्रक ड्रायव्हरने अरुणचा खळखळून हसतानाचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकला आणि सकाळ होईपर्यंत तो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला.

Laughing Boy Arun Kumar

|

Sakal

मीम्स गाजले, पण वाचताही येत नव्हते

अरुणवर असंख्य मीम्स तयार झाले, लोक ते वापरू लागले; पण हे सगळे त्याला वाचताच येत नव्हते, कारण चौथीनंतर त्याचे शिक्षणच झाले नव्हते.

Laughing Boy Arun Kumar

|

Sakal

नेहरूने उचलला शिक्षणाचा विडा

व्हायरल झाल्यानंतर खरा टर्निंग पॉइंट आला; ज्या ट्रक ड्रायव्हरने कामाला ठेवले होते, त्याच नेहरूने अरुणला शिकवण्याचा विडा उचलला.

Laughing Boy Arun Kumar

|

sakal

ट्रकचे केबिनच बनले क्लासरूम

नेहरूने स्वतःच्या खिशातून पुस्तके आणि परीक्षेची फी भरून अरुणला दहावीची तयारी करून घेतली; गाडी चालवण्याच्या मधल्या वेळेत आणि झोपेचा वेळ बाजूला सारून त्याला वाचायला-लिहायला शिकवले.

Laughing Boy Arun Kumar

|

Sakal

रात्रंदिवस कष्ट घेत झाला दहावी पास

अरुणनेही रात्रंदिवस मेहनत घेतली आणि दहावीची परीक्षा पास झाली; लाखो मीम्सपेक्षा 'पास' झालेला निकाल हीच त्याच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट ठरली.

Laughing Boy Arun Kumar

|

Sakal

नशीब दार उघडते, पण जिद्दच पुढे नेते!

नशीब फक्त दार उघडते, पण पुढे जायला कष्ट आणि जिद्द लागते. मीममधून सुरू झालेला अरुणचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे; तुमचे मत खाली नक्की कळवा!

Laughing Boy Arun Kumar

|

Sakal

'केओस पार्टी' असते तरी काय? सोशल मीडियावरील या भन्नाट ट्रेंडमागचे गुपित जाणून घ्या!

Chaos Party

|

Sakal

Click Here!