Pranali Kodre
भारताचा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके केली आहेत. त्याच्या हा विक्रम मोडणे अद्याप तरी कोणाला शक्य झालेलं नाही.
परंतु, भारतीय क्रिकेट संघाचे माजी सलामी फलंदाज वासीम जाफर यांनी विराट कोहली सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक १०० शतकांचा विक्रम मोडेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
विराट कोहली हा आता ३६ वर्षांचा आहे. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८२ शतके झळकावली आहेत.
सचिन तेंडुलकरच्या शंभर शतकांना मागे टाकण्यासाठी विराट कोहलीला आणखी १९ शतकांची आवश्यकता आहे.
वासीम जाफर याप्रसंगी म्हणाले, की विराट कोहली ज्याप्रमाणे पाकिस्तानविरुद्ध खेळत होता, तशाप्रकारची फलंदाजी बघायला प्रत्येक जण उत्सुक होता. विराट कोहलीच्या बॅटमधून धावा निघाल्या की सर्वच आनंदी होतात.
ते पुढे म्हणाले, विराट कोहली आणखी तीन ते चार वर्षे आरामात क्रिकेट खेळू शकतो. त्याच्याकडून आणखी विक्रम मोडले जाऊ शकतात. सचिन तेंडुलकरने केलेला सर्वाधिक शतकांचा विक्रमही त्याच्याकडून मोडण्यात येईल.
जेव्हा सचिन तेंडुलकरने शंभर शतके झळकावली, तेव्हा हा विक्रम मोडला जाणार नाही, असे वाटू लागले होते; पण विराट कोहलीने आपल्या झंझावाताने ८२ शतकांपर्यंत मजल मारली आहे. त्याने विक्रम मोडल्यास सचिन तेंडुलकरलाही आनंद होईल, असंही ते म्हणाले.
विराटच्यान ८२ आंतरराष्ट्रीय शतकांमध्ये ५१ वनडे शतकांचा, ३० कसोटी शतकांचा आणि १ टी२० शतकाचा समावेश आहे.