Monika Lonkar –Kumbhar
त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी बाहेरील उपचारांसोबतच तुम्ही आहाराची देखील मदत घ्यायला हवी.
'व्हिटॅमिन सी' त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. त्वचेच्या आरोग्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन सी समृद्ध पेयांचा आहारात समावेश करू शकता. कोणती आहेत ती पेये? जाणून घेऊयात.
'व्हिटॅमिन सी' चा प्रमुख स्त्रोत असलेल्या किवीची स्मूदी त्वचेतील कोलेजनच्या उत्पादनासाठी फायदेशीर आहे.
संत्र्याच्या ज्यूसमध्ये पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी आणि फॉलिक ॲसिड देखील आढळते. जे त्वचा चमकदार दिसण्यास मदत करते.
अननसाचा ज्यूस प्यायल्याने शरीराला व्हिटॅमिन सी मिळते आणि त्वचेवरील पिंपल्स आणि डागांपासून मुक्त होण्यास मदत होते.
आवळ्याच्या रसामध्ये व्हिटॅमिन सीचे भरपूर प्रमाण आढळते. जे त्वचेसाठी फायदेशीर आहे.
पाण्यात लिंबू आणि पुदिना मिसळून प्यायल्याने शरीर डिटॉक्सिफाय होते आणि हायड्रेट राहते, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.