Monika Shinde
पावसाळ्याची चाहूल लागली आहे आणि हवेत गारवा पसरू लागला आहे. अशा वेळी गरमागरम मक्याची भाकरी आणि झणझणीत मिरचीचा ठेचा खाण्याची मजा काही औरच!
मका साधारणपणे आरोग्यसाठी अतिशय फायदेशीर असतो. त्याच्या पिठापासून बनवलेली भाकरी शरीराला एक ऊर्जा देण्यासोबतच आवश्यक पोषणतत्त्वांची कमतरता देखील पूर्ण करतो. आणि आपल्या हेल्दी राहण्यास मदत मिळते.
मक्याच्या भाकरी मध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B3, व्हिटॅमिन E, फायबर भरपूर प्रमाणात समाविष्ट असतात.
मक्याच्या भाकरी डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कारण यामध्ये व्हिटॅमिन A आणि बीटा-कॅरोटीन चांगल्या प्रमाणात असतात.
मक्याची भाकरी अॅनिमिया रोखण्यासाठी उपयुक्त ठरते. कारण ती आयरन, व्हिटॅमिन B1, B3, मॅग्नेशियम आणि झिंक यांसारखी महत्त्वाची पोषक तत्त्वे प्रदान करतो. शरीराला आवश्यक असलेले पोषण तत्व पुरवतो, ज्यामुळे अॅनिमियाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
मक्याच्या भाकरी खाल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. कारण ह्यात फायबर्स, कमी कॅलोरी, ग्लूटन फ्री, आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्ससारखी पोषक तत्त्वे आहेत. यामुळे आपल्याला जास्त खाण्याची इच्छा होत नाही. आणि पचनक्रिया देखील सुधारते. आणि वजन नियंत्रणात राहते.
पावसाळ्यात मक्केची भाकरी उबदार आणि ऊर्जा देणारी असते. यामुळे शरीराला सर्दी आणि थंडीपासून संरक्षण मिळते आणि शरीरातील तापमान नियंत्रणात राहते.
गोकर्ण ट्रिप प्लॅन करताय? ही १० ठिकाणं लिस्टमध्ये ठेवा!