सकाळ डिजिटल टीम
गिधाडांची घटती संख्या पर्यावरणासाठी कशा प्रकारे धोकादाय ठरु शकते तुम्हाला माहित आहे का?
गिधाड हा निसर्गातील एक अत्यंत महत्त्वाचा पक्षी आहे, ज्याला निसर्गाचा सफाई कामगार म्हणून ओळखले जाते. पर्यावरणाच्या रकक्षणासाठी गीधाड हा किती महत्वपुर्ण पक्षी आहे जाणून घ्या.
गिधाडे शिकार करत नाहीत, तर केवळ मृत प्राण्यांच्या मांसावर (कॅरियन) जगतात. त्यामुळे त्यांना 'मृतभक्षक' म्हंटले जाते.
मृत प्राण्यांचे सडलेले मांस खाऊन गिधाडे पर्यावरण स्वच्छ ठेवतात. त्यांच्या पोटात असलेले आम्ल (acid) अतिशय शक्तिशाली असते, ज्यामुळे ते कुजलेल्या मांसातील जीवाणू आणि विषाणूंचा नाश करतात. यामुळे रोगराई पसरण्याचा धोका कमी होतो.
मृतदेहांचा फडशा पाडल्याने रेबीज, पटकी आणि संसर्गजन्य काळपुळी (anthrax) यांसारख्या आजारांचा प्रसार रोखण्यास मदत होते.
गिधाडे अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा 'कीस्टोन प्रजाती' (Keystone Species) आहे, जी निसर्गाचा समतोल राखते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे मृतदेहांचे ढिगारे वाढतात आणि रोगराई पसरते.
मादी गिधाड दरवेळी एक किंवा दोन अंडी घालते. नर आणि मादी दोघेही घरटे बांधणे, अंडी उबवणे आणि पिलांना चारा भरवण्याचे काम करतात.
मृत जनावरांचे मांस खात असताना गिधाडांमध्ये सामाजिक क्रमवारी दिसून येते. ही क्रमवारी त्यांच्या शरीराचा आकार आणि चोचीच्या ताकदीनुसार ठरते.
गिधाडे पर्यावरणाच्या नैसर्गिक स्वच्छतेसाठी अत्यंत आवश्यक आहेत. दुर्दैवाने, डायक्लोफेनॅकसारख्या औषधांच्या वापरामुळे आणि अधिवासाच्या नुकसानीमुळे त्यांची संख्या खूप कमी झाली आहे, ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. त्यांच्या संरक्षणासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.