वाल्मिक कराडच्या 10 अलिशान गाड्या जप्त

संतोष कानडे

वाल्मिक कराड

संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याच्या नावावर असलेल्या अलिशान गाड्या सीआयडीने जप्त केल्या आहेत.

जॅग्वार लँड रोवर

वाल्मिक कराडच्या अलिशान गाड्यांमध्ये फोर्ड इंडिवर, जॅग्वार लँड रोवर, मर्सिडिज बेंझ, बीएमडब्ल्यू, टोयोटा इनोव्हा या गाड्यात आहेत.

जेसीबी

तसेच अशोक लिलँडचं एक वाहन, एक जेसीबी, अशोक लिलँडचं दुसरं वाहन, महिंद्रा ट्रॅक्टर, दुसरा ट्रॅक्टर या वाहनांचा समावेश आहे.

आरोपपत्र

सीआयडीने खंडणीचं ४३८ पानांचं आरोपपत्र बीडच्या कोर्टात दाखल केलं आहे.

मालमत्ता

वाल्मिक कराडच्या इतर मालमत्तांबाबत मात्र अद्याप कुठलीही माहिती यामध्ये नाही

बीड

वाल्मिक कराडची बीडसह पुणे, सोलापूर, लातूर, धाराशीव, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांमध्ये मालमत्ता आढळून आलेली होती

सीआयडी

ही मालमत्ता इतरांच्या नावावर असू शकते, त्यामुळे त्यावर सीआयडी कोणत्या प्रकारे कारवाई करणार, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

व्हायरल

संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर सोमवार, दि. ३ मार्च रोजी त्यांना मारतानाचे फोटो व्हायरल झाले होते.

राजीनामा

फोटोंमुळे राज्यात जनक्षोभ उसळला होता. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला गेला.