Aarti Badade
योग्य झोप शरीराचं पुनरुज्जीवन करते आणि त्वचेला नैसर्गिक चमक देते.
किमान ३ लिटर पाणी रोज पिल्यास त्वचा हायड्रेटेड राहते आणि कोरडेपणा दूर होतो.
फळं, भाज्या आणि अँटिऑक्सिडंट्स त्वचेला आतून पोषण देतात आणि ताजगी राखतात.
व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते, कोलेजन तयार होतं आणि त्वचेला नैसर्गिक तेज मिळतं.
घरात असो वा बाहेर, SPFयुक्त सनस्क्रीन लावल्यामुळे त्वचा UV किरणांपासून सुरक्षित राहते.
ध्यान, योगा किंवा श्वासोच्छ्वासाचे व्यायाम मन शांत ठेवतात आणि त्वचेवर सकारात्मक परिणाम करतात.
नियमित फेस वॉश, स्क्रब व मॉइश्चरायझर वापरा. स्वच्छ त्वचा म्हणजे चमकदार त्वचेचा पाया.