Amit Ujagare (अमित उजागरे)
भारताप्रमाणं पाकिस्तानातही 'वक्फ बोर्ड' आहे पण त्याला वक्फ बोर्ड असं म्हटलं जात नाही. तर 'औकाफ विभाग' असं संबोधलं जातं.
पाकिस्तानात १९६० च्या दशकात वक्फ संपत्तीच्या नियोजनासाठी पावलं उचलायला सुरुवात केली. त्यानंतर हा 'औकाफ विभाग' तयार झाला.
या विभागांतर्गत सरकारनं अशा प्रकारच्या धार्मिक संपत्ती आपल्या ताब्यात घेतल्या.
पाकिस्तानात वक्फ संपत्तीचं नियंत्रण विविध प्रांतिक औकाफ विभागांद्वारे केलं जातं. सिंध, पंजाब, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा या प्रांतांचे वेगळे औकाफ विभाग आहेत.
या बोर्डांचं काम मशिदी, दर्गा, कब्रस्तान आणि इतर धार्मिक स्थळांची देखरेख आणि देखभाल करणं हे आहे.
दान, भाड्यातून मिळणाऱ्या संपत्तीचा वापर धार्मिक शिक्षण, गरिबांची मदत आणि आरोग्य सेवांसारख्या सेवाभावी कामांसाठी वापरली जाते.
एका पाकिस्तानी न्यूज वेबसाईटनुसार, औकाफ बोर्डाकडं एकूण १ लाख ०९ हजार ३६९ एकर जमीन आहे.
यांपैकी पंजाब प्रांतात ८५,३३१ एकर, सिंध प्रांतात २१,७३५ एकर आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतात २,३०१ एकर तर बलुचिस्तानात २ एकर इतकी जागा आहे.
भारतात वक्फ बोर्डाकडं ९.४० लाख एकर जमीन आहे. यामध्ये सर्वाधिक १,४०,१०८ शेतजमीन, ३३,०५६ दर्गा, मजार, मकबरे तर २०४२ शाळांच्या जमिनीचा समावेश आहे.
भारतात रेल्वे आणि संरक्षण विभागानंतर सर्वाधिक जमीन ही वक्फ बोर्डाकडं आहे.