Weapons used in Indian Army:भारतीय लष्करात वापरल्या जाणाऱ्या रायफल्स

सकाळ डिजिटल टीम

एके-४७

भारतीय सेनेत सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाणारी रायफल म्हणजे एके-४७.ही रशियन बनावटीची रायफल असून एका मिनिटात ६०० गोळ्या झाडण्याची या बंदुकीची क्षमता आहे.

Ak 47 | Esakal

सिगसॉर-७१६

सिगसॉर७१६ ही अमेरिकन बनावटीची रायफल असून एका मिनिटात ७०० गोळ्या झाडण्याची क्षमता आहे. २०१९मध्ये भारताने ७२००० च्या संख्येत या रायफल्स खरेदी केल्या होत्या.

SigSour | Esakal

ड्रॅगूनोव्ह

ही रशियन बनावटीची स्नायपर प्रकाराची बंदूक आहे. लांबच्या पल्ल्यातील शत्रूला कंठस्नान घालण्यासाठी ही बंदूक वापरली जाते.

Dragunov | Esakal

बॅरेट एम-९५

ही अमेरिकरन बनावटीची स्नायपर आहे.या रायफलमध्ये ५०बीएमजी गोळीचा वापर केला जातो.जो व्यक्ती या गोळीचा निशाना बनतो, त्याची जगण्याची शक्यता कमी असते.

Berret M95 | Esakal

टॅवोर-२१

ही रायफल हलक्या वजनाची आणि आकाराने लहानअसून स्पेशल फोर्सेकडून या रायफलचा वापर होतो.

Tavor 21 | Esakal

एम-१६ए२

ही रायफल ५५० मीटर पर्यंत अचूक मारा करु शकते. हलक्या वजनाची रायफल असून जगात बऱ्याच देशातील सेना या रायफलचा वापर करतात.

M16A2 | Esakal

INSAS-

ही भारतीय बनावटीची रायफल असून, भारतीय सेनेत मोठ्या प्रमाणावर वापरली जात होती.मात्र, काही तांत्रिक अडचणी आल्याने या बंदूकीचा वापर कमी करण्यात आला.

INSAS | Esakal

यूएमपी

ही लहान आणि हलक्या वजनाची सबमशीन गन असून एनएसजीकडून वापरली जाते. एनएसजी प्रामुख्याने शहरी आंतकवाद्यांशी दोन हात करतात, त्यामुळे त्यांना हलक्या बनावटीची बंदूक वापरणे उपयुक्त ठरते

UMP | Esakal