संतोष कानडे
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे देशभर चाहते आहेत, सोशल मीडियात कायम तिच्या लग्नाची चर्चा असते.
सौंदर्य, अदाकारी आणि अस्सल अभिनयामुळे उर्वशी चर्चेत असते. मागे ती ऋषभ पंतमुळे चांगलीच चर्चेत होती.
उर्वशीच्या लग्नाची सध्या चर्चा सुरु झाली आहे. एका सोशल मीडिया इन्फ्लूएन्सरसोबत तिचं नाव जोडलं जात आहे.
उर्वशीचं नाव ज्याच्याशी जोडलं जातंय, तो आहे ओरहान अवत्रमणी अर्थात ओरी. उर्वशीनेच पुढाकार घेतल्याने दोघांबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.
ओरीने स्वतःचा एक फोटो सोशल मीडियात शेअर केला होता. त्यावर उर्वशी लिहिते, तुझ्या लग्नात सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे.
त्यावर ओरीचा रिप्लाय 'आपलं' असा येतो आणि मग सोशल मीडियात एकच चर्चा रंगते.
दोघे खरंच लग्न करतात की नुसती चर्चेची राळ उडवून देतात, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. मात्र दोघांच्या चाहत्यांना हा नवीनच विषय मिळाला आहे.
अनिल शर्मा यांच्या सिंह साब द ग्रेट या चित्रपटातून तिने करिअरला सुरुवात केली.
उर्वशीने सिंह साब द ग्रेट, मि. ऐरावत, भाग जॉनी, सनम रे यासह काबिल, हेट स्टोरी, ग्रेट ग्रँड मस्ती, वर्जिन भानुप्रिया, पागलपंती या चित्रपटांमध्ये काम केलं.