Anushka Tapshalkar
अंकशास्त्रानुसार ३० जून ते ६ जुलै २०२५, या आठवड्यात कोणता मूलांक अनुभवेल यश, प्रेम, पैसा आणि संधी? जाणून घ्या पुढे
या आठवड्यात तुमच्या कार्यक्षमतेचं कौतुक होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जरी काही प्रोजेक्टबद्दल संभ्रम असेल, तरी धाडसी निर्णय तुम्हाला यश मिळवून देतील.
तुमच्यासाठी हा आठवडा संयम ठेवण्याचा आहे. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. प्रेमसंबंधात मतभेद टाळा, आणि कामात शांतपणे वाटचाल करा.
व्यवसायात लाभदायक निर्णय घेता येतील. आर्थिक दृष्टिकोनातून आठवडा मजबूत आहे. गुंतवणुकीचे चांगले फळ मिळू शकते. एकूणच संपत्ती वाढण्याचे संकेत आहेत.
व्यवसायात मोठे फायदे होऊ शकतात, मात्र मन थोडं अस्वस्थ राहू शकतं. प्रेमसंबंधात समाधान मिळणार नाही, त्यामुळे भावनिक स्थैर्य राखा.
तुमच्या प्रेमात गोडवा येईल. तुमचं संवादकौशल्य आणि नेटवर्किंगमुळे कामात यश मिळेल. आर्थिक फायद्याची शक्यता आहे.
कार्यक्षेत्रात नवी संधी मिळेल. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. हा आठवडा तुमच्या आत्मविश्वासासाठी फायदेशीर ठरेल.
लव्ह लाइफमध्ये रोमँस वाढेल. आर्थिक बाबतीत नशिबाची साथ लाभेल. काही प्रोजेक्ट्समध्ये अडथळे येऊ शकतात, पण संयमाने निर्णय घ्या.
प्रगती संथ असली तरी स्थिर राहील. प्रेमसंबंधात एका स्त्रीमुळे संबंध अधिक मजबूत होऊ शकतात. थोडं मानसिक तणाव जाणवेल.
तुमचं कार्यक्षेत्रात कौतुक होईल. प्रेमसंबंधात वाद घालणे टाळा, अन्यथा मोठं भांडण होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.
तुमच्या जन्मतारखेचे एकूण योग (उदा. 29 → 2+9=11 → 1+1=2) काढून मूलांक ठरवा. त्या आधारे तुमचा आठवड्याचा मार्गदर्शक ठरवा!