Saisimran Ghashi
हल्ली अचानक वजन वाढणे, चरबी जमा होऊन पोट सुटणे या समस्या वाढल्यात.
लोक यावर उपाय म्हणून जीम, डाएट यासाठी हजारो रुपये खर्च करतात.
आम्ही तुम्हाला एकदम स्वस्तात मस्त उपाय सांगणार आहे ज्याने तुम्हाला नक्की फायदा होईल.
तुम्ही सुटलेलं पोट आणि वजन नियंत्रणात आणण्यासाठी मेथी दाण्याचे पाणी प्या.
रोज एक ग्लास पाण्यात मेथी दाणे टाका त्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी मीठ टाका.
मेथी दाणे थोडा वेळ पाण्यात भिजुदेत. त्याचा अर्क पाण्यात उतरेल.
मग हे पाणी प्या. १५ दिवस रोज हा उपाय करा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल.
पण यासोबत योग्य आहार आणि पुरेसा व्यायामदेखील करणे गरजेचे आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.