Amit Ujagare (अमित उजागरे)
रेल्वे लाईनवर लागलेला रेड सिग्न तोडून पुढे जाणं हा गंभीर गुन्हा आहे. त्यासाठी लोको पायलटला तीन टप्प्यांवर शिक्षा होते.
रेल्वेनं सिग्नल तोडणं याला SPAD (सिग्नल पास्ड अॅड डेंजर) समजलं जातं. त्यासाठी लोको पायलटची खात्यांतर्गत चौकशी होते. यामध्ये त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाते.
इंडियन रेल्वे अॅक्ट १९८९ अंतर्गत विविध कलमांतर्गत गुन्हे. कलम 137 (खोटं बोलून सुरक्षेत कसूर - एक वर्षाची शिक्षा आणि दंड).
कलम 151 (मुद्दाम धोका पत्करला - 10 वर्षांची शिक्षा किंवा जन्मठेप), कलम 154 (निष्काळजीपणा - दंडासह एक वर्षाची शिक्षा), कलम 175/179 (नियम तोडला- दंडासह 2 वर्षांची शिक्षा) अशी कारवाई होते.
रेड सिग्नल तोडून रेल्वे पुढे नेली आणि त्यामुळं रेल्वेची दुसऱ्या रेल्वेला धडक बसल्यास किंवा अपघात झाल्यास भारतीय फौजदारी कायद्यातंर्गत (IPC) शिक्षा होते.
यामध्ये सिग्नल तोडल्यामुळं दोन रेल्वेंची टक्कर होणे, रेल्वे रुळावरुन घसरणे आणि रेल्वेच्या अपघातामुळं प्रवाशांचा मृत्यू होणे या गोष्टींचा आयपीसीच्या कलमांतर्गत शिक्षांचा समावेश होतो.
IPCच्या कलम 304 A (निष्काळजीपणामुळं प्रवाशांचा मृत्यू - 2 वर्षे तुरुंगवास आणि दंड), कलम 337/338 (जीव धोक्यात आणणारी कृती केल्यानं गंभीर दुखापत), कलम 279 (जाणीवपूर्वक निश्चित वेगापेक्षा अधिक वेगानं रेल्वे चालवणे)
अंतिम शिक्षा या गोष्टींवर अबलंबून असेल - जाणीवपूर्वक अपघाताच्या उद्देशानं सिग्नल तोडला, सिग्नल तोडल्यामुळं मृत्यू झाले किंवा रेल्वेचं नुकसान झालं, DRM किंवा CRS मार्फत अंतर्गत चौकशीचा निकाल
सिग्नल तोडल्यामुळं जर काही अपघात झाल्यास लोको पायलटची मानसिक आणि शाररिक तपासणी केली जाते. अनेकदा तर यामुळं लोको पायलटला सक्तीनं कामावरुन काढून टाकलं जातं.