Saisimran Ghashi
रोजच्या आहारातून शरीराचे पोषण होत असते. हल्ली जेवणात चपाती, पुरी, पराठा किंवा नान यांचा समावेश असतो. पण ज्वारीचा वापर कमी होतो.
गहू आणि इतर धान्यांपेक्षा ज्वारी पचायला हलकी व आरोग्यासाठी गुणकारी मानली जाते.
ज्वारीमध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. यामुळे पोट साफ होण्यासाठी मदत होते. ऍसिडिटीचा त्रास असणाऱ्यांनी आवर्जून ज्वारीची भाकरी खावी.
किडनी स्टोनचा त्रास होत असेल तर आहारात ज्वारीचा समावेश केल्यास पोषक तत्त्वांमुळे त्यावर आराम मिळू शकतो.
ज्वारीमध्ये लोह तत्त्व मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे ऍनिमियाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश नक्की करावा.
ज्वारीमुळे रक्तवाहिन्यांमधील कोलेस्टेरॉल कमी होऊ शकते. त्यामुळे हृदयाशी संबंधित विकारांना दूर ठेवता येते.
ज्वारीमुळे शरीरातील इन्शुलिनचं प्रमाण नियंत्रित ठेवता येऊ शकतं. यामुळे मधुमेहींना मोठा फायदा होऊ शकतो.
ज्वारीच्या सेवनामुळे मासिक पाळी व गर्भाशयाच्या समस्यांवर तोडगा निघू शकतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.