Amit Ujagare (अमित उजागरे)
शरिराला आरोग्यदायी ठेवण्यासाठी दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणं आवश्यक असतं.
लोक दररोज सकाळी कोमट पाणी पितात. पण जर चुकून पाणी जास्त गरम झालं तर त्यात थंड पाणी मिसळून प्यायलं जातं.
पण जर तुम्ही नेहमी गरम पाण्यात थंड पाणी मिसळून पित असाल तर ही सवय आत्ताच बदला, कारण याचा वाईट परिणाम होऊ शकतो.
कारण जेव्हा पाणी गरम करता तेव्हा त्यातील जीवाणू नष्ट होतात. तर थंड पाणी दुषित असू शकतं, त्यामुळं तुम्ही दोन्ही पाणी मिक्स केल्यास त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो.
थंड पाणी पचायला जड जातं तर गरम पाणी पचायला हलकं असतं. जर तुम्ही हे दोन्ही पाणी एकत्र करुन पित असाल तर तुम्हाला अपचन होऊ शकतं.
जर एकाच वेळी थंड आणि गरम पाणी जर प्यायलं तर त्यामुळं तोंड येण्याचा किंवा दातांना ठणक लागण्याचा त्रास होऊ शकतो.
जर तुम्हाला कोमट पाणी प्यायची सवय असेल तर अधिक गरम झालेलं पाणी थोडसं थंड करुन प्यावं, पण त्यात थेट थंड पाणी मिसळू नये.
हाच नियम आईस्क्रीम खाताना देखील लागू होतो. एखादा गरम पदार्थ खाल्यानंतर लगेच आईस्क्रीमसारखे थंड पदार्थ खाऊ नयेत.