कार्तिक पुजारी
रहस्यमयी पेजर स्फोटामुळे लेबनॉन हादरला आहे, यात ९ लोकांचा मृत्यू झालाय, तर २,७०० लोक जखमी झालेत.
या पार्श्वभूमीवर पेजर्स काय असतात हे आपण जाणून घेऊया
पेजर्स हे बिपर्स म्हणून देखील ओळखले जातात. हे वायरलेस टेलिकम्युनिकेशन डिव्हाईस आहेत
यात अल्फान्यूमेरिक किंवा व्हॉईस मेसेज पाठवला जातो. १९८० च्या दशकात यांचा मोठ्या प्रमाणात वापर व्हायचा
पण, सध्या देखील काही ग्रुप याचा वापर करत आहेत. यात, मेडिकल प्रोफेशनल्सचा प्रामुख्याने समावेश होतो
लेबनॉनमधील हिजबोल्लाहचे काही सदस्य या पेजर्सचा वापर अंतर्गत संपर्कासाठी करत असतात
पेजर्स हे आपल्या मोबाईल फोनपेक्षा कमी ट्रेसेबल असतात, त्यामुळे याचा वापर केला जात आहे