Saisimran Ghashi
सूर्यनमस्कार हा केवळ योगासने करण्याचा प्रकार नसून, तो एक संपूर्ण शरीरासाठी उपयुक्त असा व्यायाम आहे.
यामध्ये १२ आसनांचा समावेश असून, शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधण्यासाठी हा अत्यंत प्रभावी योग प्रकार मानला जातो.
सूर्यनमस्कार हा पूर्ण शरीराचा व्यायाम असून, यामुळे स्नायू ताठर होण्याऐवजी लवचिक राहतात. शरीर सशक्त आणि तंदुरुस्त राहते.
नियमित सूर्यनमस्कार केल्याने कॅलरीज जळतात, वजन नियंत्रणात राहते आणि शरीरातील चयापचय क्रिया वेगवान होते.
सूर्यनमस्कारामुळे तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते. मन शांत राहते, एकाग्रता वाढते आणि मानसिक स्थैर्य मिळते.
सूर्यनमस्कार केल्याने रक्ताभिसरण सुधारते, हृदय निरोगी राहते आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
सूर्यनमस्कार केल्याने पचनक्रिया सुधारते, टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यामुळे विविध आजारांपासून संरक्षण मिळते.
रोज 2-3 सूर्य नमस्कार घालण्यापासून सुरुवात करा आणि आरोग्याला मिळणारे फायदे अनुभवा.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.