Puja Bonkile
दरवर्षी २४ मार्चला जागतिक टीबी दिन म्हणून साजरा केला जातो.
सामान्य लोकांना या आजाराबद्दल माहिती मिळावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो. टीबीची सुरूवातीची लक्षणे कोणती आहेत हे जाणून घेऊया.
2 आठवडे किंवा त्याहून जास्त दिवस सतत खोकला असणे.
खोकताना कफात रक्त येणे.
संध्याकाळी वाढणारा सौम्य ताप येणे.
रात्री झोपताना जास्त घाम येणे.
कोणतेही स्पष्ट कारण नसताना जलद वजन कमी होणे.
शारीरात वेदना होणे आणि अशक्तपणा जाणवतो.