Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराज यांना महाराष्ट्राचं दैवत मानलं जातं आणि त्यांची कीर्ती संपूर्ण जगभर पसरलेली आहे.
शिवाजी महाराजांविषयी अधिकाधिक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते.
छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन शौर्याने परिपूर्ण होतं आणि त्यांनी अनेक पराक्रम गाजवले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिवकाल ग्रंथ या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या कार्याचा पुराव्यासहित तपशील सादर केला आहे.
औरंगजेबाने स्वत:च मान्य केलं की शिवाजी महाराजांचा सामना करणे कठीण होते
शिवाजी महाराजांनी स्वत:च्या कुशल नेतृत्वाने आणि रणनितीने स्वराज्य स्थापन केलं.
त्यांची स्वराज्य निर्मितीची कल्पना आणि धाडस आजही प्रेरणादायी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र शुद्ध १५ (इ. स. १६८०, ३ एप्रिल) या दिवशी, रायगडावर शनिवारी दोन प्रहर दिवसा देह ठेवला होता.
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने देखील त्यांचे कौतुक केले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला चांगलाच धडा शिकवला होता.
औरंगजेब त्याच्या महत्त्वाकांक्षी मनसुब्यांमध्ये कधीही यशस्वी होऊ शकला नाही.
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने शिवाजींच्या लढाऊ कौशल्याची प्रशंसा केली.
औरंगजेब म्हणाला, "शिवाजी हा मोठा पराक्रमी योद्धा होता. हिंदुस्थानातील प्राचीन राज्यं नष्ट करण्याचा माझा सतत प्रयत्न होता, पण शिवाजीचं साम्राज्य मात्र सतत वाढत राहिलं."
R. C. Muzumdar यांच्या An Advanced History of India (पृष्ठ ४४८) आणि Sardesai यांच्या New History of the Marathas (भाग १, पृष्ठ २९६-९७) मध्ये यासंबंधी माहिती दिली आहे.