Sandip Kapde
औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा १२ वर्षांनी मोठा होता आणि महाराजांच्या निधनानंतर त्याला आणखी २७ वर्षांचे आयुष्य लाभले. मात्र, शिवाजी महाराजांनी त्याला जो पराभव दिला, तो तो कधीही विजयात बदलू शकला नाही.
त्याने मोठी चूक केली होती, त्यामुळे जेव्हा त्याच्या मृत्यूची वेळ जवळ आली, तेव्हा त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली.
औरंगजेबाने आपल्या मुलांसाठी एक मृत्यूपत्र तयार केले, ज्यामध्ये त्याने काही सल्ले आणि 12 सूचना दिल्या. इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी आपल्या पुस्तकात या मृत्यूपत्राचा फारसीमधून इंग्रजीत अनुवाद केला आहे.
या पत्रात औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लिहिलं आहे. औरंगजेबाने आपल्या आयुष्याची शेवटची २६ वर्षे मराठ्यांचं राज्य नष्ट करण्याच्या प्रयत्नात घालवली. परंतु अनेक मावळ्यांनी औरंगजेबाचं हे स्वप्न कधीही पूर्ण होऊ दिलं नाही.
औरंगजेबाच्या छावण्यावर हल्ले करुन मावळ्यांनी औरंगजेबाचे लचके तोडले आणि स्वत:ला हिंदुस्थानाचा बादशाह म्हणून घेणाऱ्या औरंगजेबाचा शेवट अतिशय हास्यास्पद झाला.
जानेवारी १७०६ रोजी औरंगजेबाने अहमदनरमध्ये माघार घेतली. आता आपलं मरण जवळ आलं हे त्यांच्या लक्षात आलं.
तो वारंवार आजारी पडत होता तरी देखील जिद्दीने दरबारात हजेरी लावत होता. त्याच्या आयुष्यात त्याच्याकडून झालेली सगळ्यात मोठी चूक सुधारायची होती. त्यासाठी तो मराठ्यांशी झगडत होता.
पण अखेर हा खेळ मराठ्यांना न संपवताच संपला, २० फेब्रुवारी १७०७ रोजी औरंगजेबाचा मृत्यू झाला.
मरणाच्या अगोदर औरंगजेबाचे शेवटचे शब्द होते अजमा फसाद बख, म्हणजे मेरे बाद फसाद अर्थात माझ्यानंतर अंधाधुंदी माजेल.
याची जाणीव औरंगजेबाला झाली होती म्हणून त्याने आपल्या मुलांसाठी लिहलेल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवले की अंधाधुंदी टाळायची असेल तर मुघल साम्राज्याचे विभाजन करा.
म्हणजे लढाया होणार नाहीत आणि कत्तली टळतील. हमीद्दून खान बहादुर यांनी लिहलेल्या पुस्तकार मृत्यूपत्र दिलं आहे. हे खरं पत्र बिकानेर संग्रहालयात आजही आहे.
औरंगजेब म्हणतो, पापामध्ये बुडून गेलेल्या माझ्यावतीने पापा पासून सुटका म्हणून हसनच्या कबरीवर माझ्या वतीने चादर चढवा.
हे काम माझा मुलगा आझम करेल, मी ज्या टोप्या शिवल्या त्याचे चार आणे दोन रुपये आले आहेत. ते माझ्या कफनावर खर्च करावे.
कुरानाच्या हस्तलिखीत प्रती विकून आलेले ३०५ रुपये फिकीरांमध्ये वाटून टाकावे. औरंगजेबाने १२ वी महत्वाची सूचना आपल्या मुलांना दिली.
राज्याची संपूर्ण माहिती कळणे हा राज्याचा प्रमुख आधार समजला जातो.
औरंगजेब लिहितो, एक क्षणभर जरी बेसावधपणा असला तर अनेक वर्षापासून केलेले कार्य वाया जाण्याची वेळ येते.
माझ्या निष्काळजीपणामुळे छत्रपती शिवाजी महाराज माझ्या नजरकैदेतून पळाले आणि माझ्या मरणाच्या अखेरीपर्यंत मला मराठ्यांशी जीवन मरणाचा संघर्ष करावा लागतो.
शिवाजी महाराजांची आग्र्याच्या कैदेतून सुटका झाली १६६६ साली आणि ही गोष्टी १७०७ साली औरंगजेबाला आपल्या मृत्यूच्यावेळी आठवते.
याचे कारण म्हणजे ४० वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी त्याच्या हातावर तुरी दिल्या.
त्यानंतर देखील शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज मुघलांशी लढले, नंतर मराठ्यांनी देखील मुघलांना सळो की पळो करून सोडले.