इस्त्राईलमधून भारत नेमक्या कोणत्या गोष्टी आयात करतो?

रोहित कणसे

इस्त्राईल आणि ईराण यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे ज्याचा भारतावर देखील परिणाम पडू शकतो.

आपण आज जाणून घेणार आहोत की भारत इस्त्राईलकडून नेमक्या कोणत्या वस्तू आयात करतो.

भारत आणि इस्त्राईलमधअये राजनैतिक संबंध खूप मजबूत आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापर देखील खूप वर्षांपासून होत आला आहे.

भारत दीर्घकाळापासून भारत दीर्घकाळापासून इस्राईलकडून संरक्षण उपकरणे आयात करत आहे. भारत सध्या इस्राईलकडून अत्याधुनिक संरक्षण उपकरणे, शस्त्रास्त्र प्रणाली, क्षेपणास्त्र तंत्रज्ञान इत्यादींची आयात करतो.

इस्राईलकडे कृषी संकटाचा सामना करण्यासाठी भारताकडून आयात केलेली अत्याधुनिक कृषी उपकरणे देखील आहेत. त्यामुळे भारताचा कृषी क्षेत्रात झपाट्याने विकास होत आहे.

भारत इस्राईलकडून रसायने आणि खतेही आयात करतो. ही रसायने आणि खते शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी फायदेशीर मानली जातात.

इस्रायल हा हिरे निर्यात करणारा देश आहे. येथून भारत हिरे आयात करतो आणि नंतर त्यावर भारतात प्रक्रिया केली जाते.

भारत इस्त्राईलकडून इलेक्ट्रॉनिक्स आणि सायबर सुरक्षा उपकरणे देखील आयात करतो.

इस्राईल हा आरोग्य क्षेत्रात खूप प्रगत देश असून येथून भारत वैद्यकीय उपकरणे, आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान इत्यादी देखील आयात करतो.

शाकाहारी असण्याचे तोटे माहितीयेत काय?

येथे क्लिक करा