Anushka Tapshalkar
सध्या सैयारा हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहेत. अनेकांना हा चित्रपट बघून रडायला येतं आहे.
हा चित्रपट बघून तरुण तरुणी रडत असल्याचे अनेक व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहेत.
अनेकांना या चित्रपटाची कहाणी मनापासून आवडली आहे, तर काहींनी ही अतिशयोक्ती असल्याचं म्हटलं आहे.
या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. पण हे सगळं सुरु असतानाच 'सैयारा' म्हणजे नेमकं काय? या शब्दांचा अर्थ तरी काय होतो? तुम्हाला माहिती का?
सैयारा हा एक उर्दू-अरेबिक शब्द आहे. ज्याचा अर्थ तारा किंवा लख्ख प्रकाश देणारा प्लॅनेट असा होतो. जो अवकाशात फिरतो आहे. खासकरून अरबी भाषेत याचा अर्थ सतत भ्रमंती करणारा असा होतो.
याच सैयारा शब्दाचा वापर एक था टायगर चित्रपटातील एका गाण्यातही करण्यात आला आहे.
'सैयारा तू सैयारा, सितारो के जहाँ मे मिलेंगे अब यारा', या गाण्यात सैयारा ही संकल्पना अतिशय सुंदरपणे वापरण्यात आली आहे.