Aarti Badade
'DreamMoods’ आणि ‘Ahrefs’ च्या माहितीनुसार, हे आहेत काही देशांतील सर्वात सामान्य स्वप्नांचे प्रकार.
भारतात साप स्वप्नात पाहणं हे अतिशय सामान्य आहे. हे भीती, बदल किंवा शक्तीचं प्रतीक असू शकतं.
अर्जेंटिनामधील लोकांना स्वप्नात कोळी दिसतात. हे स्वप्न गुंतागुंतीच्या भावना किंवा तणाव दर्शवतं.
ऑस्ट्रेलियामध्ये लोकांना दात पडत असल्याचं स्वप्न खूप वेळा पडतं. हे चिंता किंवा आत्मविश्वासाच्या कमतरतेचं लक्षण असतं.
बांगलादेशातील लोकांचं सर्वात सामान्य स्वप्न म्हणजे लग्न. हे नवे संबंध, जबाबदाऱ्या किंवा बदल दर्शवतो.
फ्रेंच लोकांना त्यांच्या भूतकाळातील जोडीदाराचे स्वप्न अधिक वेळा पडतात. हे न विसरलेल्या भावना दर्शवू शकतात.
जर्मनीत गरोदरपणाचं स्वप्न सामान्य आहे. हे सर्जनशीलता, नवा आरंभ किंवा जबाबदारीचं प्रतीक असतं.
नायजेरियामध्ये लैंगिक विषयक स्वप्नं सर्रास पाहिली जातात. हे इच्छा, संबंध किंवा दबलेल्या भावना दर्शवतात.
पाकिस्तानात मृत व्यक्ती स्वप्नात दिसणं हे श्रद्धा, भय किंवा अपूर्ण संवाद याचं संकेत असू शकतो.
कोरियन लोक पाण्यात बुडत असल्याचं स्वप्न जास्त पाहतात. हे भावनात्मक गुंतवणूक किंवा तणावाचं सूचक असतं.
या स्वप्नांच्या प्रकारातून लोकांच्या भावनात्मक, सामाजिक आणि सांस्कृतिक मनोवृत्तीचं दर्शन घडतं.