वॉर्ड म्हणजे नेमकं काय? ते कसे निवडले जातात? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...

Mansi Khambe

वॉर्ड म्हणजे काय?

वॉर्ड म्हणजे महानगरपालिका किंवा नगरपालिकेचा सर्वात छोटा प्रशासकीय आणि निवडणूक विभाग असतो.

BMC Ward

|

ESakal

शहराचा कारभार

मोठ्या शहराचा कारभार सोपा व्हावा, नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात यासाठी शहराला वेगवेगळ्या वॉर्डमध्ये विभागले जाते.

BMC Ward

|

ESakal

नागरिकांचे प्रतिनिधित्व

मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत, संपूर्ण मुंबई शहर 227 वॉर्डमध्ये विभागलेली आहे. प्रत्येक वॉर्डमधून एक नगरसेवक निवडून दिला जातो. हा नगरसेवक त्या वॉर्डमधील नागरिकांचे प्रतिनिधित्व करतो.

BMC Ward

|

ESakal

स्थानिकांचे प्रश्न

वॉर्डची मुख्य भूमिका स्थानिकांचे प्रश्न मांडणे असते. यात रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीटलाइट, आरोग्य सुविधा आदी येतात.

BMC Ward

|

ESakal

दुवा

वॉर्ड हा नागरिक आणि महापालिका यांच्यात दुवा ठरतो. वॉर्डमधील तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवणे, हा त्याचा उद्देश असतो.

BMC Ward

|

ESakal

कामे

विकास कामांचे नियोजन करणे, वॉर्ड निधीतून लहान-मोठी विकास कामे करणे. हे त्यांचे काम असते. वॉर्डची रचना लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र, वस्तीचा विस्तार आणि प्रशासकीय सोय पाहून केली जाते.

BMC Ward

|

ESakal

लोकसंख्या

साधारणपणे एका वॉर्डमध्ये 30 ते 60 हजारांपर्यंत लोकसंख्या असते. लोकसंख्या वाढली किंवा शहराचा विस्तार झाला तर वॉर्ड पुनर्रचना केली जाते.

BMC Ward

|

ESakal

सीमांकन

दर दहा वर्षांनी, जनगणनेनंतर, प्रभागांचे पुनर्वितरण किंवा सीमांकन केले जाते. प्रत्येक प्रभागात अंदाजे समान लोकसंख्या असणे हे उद्दिष्ट आहे.

BMC Ward

|

ESakal

सीमा

बीएमसीमधील प्रत्येक निवडणूक प्रभागाची सरासरी लोकसंख्या अंदाजे ५५,००० आहे. सीमांकन करताना, क्षेत्राचे भौगोलिक स्थान, सामाजिक रचना आणि सोयीनुसार सीमा निश्चित केल्या जातात.

BMC Ward

|

ESakal

कोणताही देश केव्हाही भारतावर टॅरिफ लाटू शकतो का? नेमका नियम काय?

Tariffs on India

|

ESakal

येथे क्लिक करा