Anuradha Vipat
जान्हवी किल्लेकरबाबत एक अफवा पसरली आहे.
ज्याविषयी आता जान्हवीने भाष्य करत या अफवांवर विश्वास न ठेवण्याची विनंती केली आहे.
जान्हवी किल्लेकर ‘बिग बॉस’च्या घरात घातलेल्या कपड्यांचा लिलाव लावणार असल्याच्या अफवा उडाल्या आहेत.
यावर “प्लीज अशा कोणत्याही चुकीच्या अफवा पसरवू नका”, असं कॅप्शन लिहित जान्हवीने व्हिडीओ शेअर केला आहे.
पुढे जान्हवी म्हणाली की, मला माझे कुठलेही कपडे विकायचे नाहीयेत. तसंच ते विकण्यासारखे नाहीयेत. ते माझे कपडे आहेत. ते मी कपडे का विकू?
पुढे जान्हवी म्हणाली की, ते काही महागडे आणि खूप ग्रेट असे कपडे नाहीयेत. त्यामुळे प्लीज उगाच काहीही अफवा पसरवू नका, ही माझी विनंती आहे.
जान्हवी सोशल मिडीयावर सक्रिय असते