सकाळ डिजिटल टीम
हिवाळ्यात बाजरीची भाकरी जास्त प्रमाणात खाल्ली जाते. कारण, त्यात उष्ण घटक असून आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
बाजरीत व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, तांबे, फॉस्फरस आणि लोह यासारखे पोषक घटक आढळतात.
बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर चणे खाऊ नयेत. यामुळे अॅसिडिटी होऊ शकते.
बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत, त्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो.
बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर तेलकट पदार्थ खाऊ नयेत. त्याचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना अल्सर, पित्ताचा त्रास किंवा आधीच पचन समस्या आहेत. त्यांनी बाजरीची भाकरी खाणे टाळावे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.