फ्रिजमध्ये नेमका कोणता गॅस असतो?

Aarti Badade

फ्रिजमध्ये नेमका कोणता गॅस असतो?

तुम्ही रोज वापरत असलेला फ्रिज आतून इतका थंड कसा राहतो, यामागे रेफ्रिजरंट गॅस आणि खास कूलिंग सिस्टम काम करते.

Refrigerator

|

Sakal

फ्रिजमध्ये असतो ‘रेफ्रिजरंट’

फ्रिजमध्ये वापरल्या जाणाऱ्या विशेष गॅसला रेफ्रिजरंट (Refrigerant) म्हणतात, जो कूलिंग प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो.

Refrigerator

|

Sakal

हा गॅस करतो तरी काय?

रेफ्रिजरंट फ्रिजच्या आतील भागातील उष्णता शोषून घेतो आणि ती बाहेर सोडतो, त्यामुळे आत थंड वातावरण तयार होते.

Refrigerator

|

Sakal

पूर्वी CFC गॅस वापरला जायचा

पूर्वी अनेक फ्रिजमध्ये CFC (क्लोरोफ्लोरोकार्बन) रेफ्रिजरंटचा वापर केला जात होता, मात्र पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांमुळे त्याचा वापर कमी करण्यात आला.

आता कोणते गॅस वापरतात?

आधुनिक फ्रिजच्या मॉडेलनुसार R-600a (आइसोब्युटेन) आणि काही जुन्या मॉडेलमध्ये R-134a यांसारखे रेफ्रिजरंट वापरले जातात.

Refrigerator

|

sakal

पर्यावरणासाठी तुलनेने चांगले पर्याय

R-600a सारख्या आधुनिक रेफ्रिजरंटचा पर्यावरणीय परिणाम CFCच्या तुलनेत कमी असतो आणि ओझोन थराच्या संरक्षणासाठी ते अधिक योग्य मानले जातात.

Refrigerator

|

esakal

मग फ्रिज सतत थंड कसा राहतो?

रेफ्रिजरंट गॅस फ्रिजच्या कूलिंग सिस्टीममध्ये सतत फिरत राहतो आणि उष्णता बाहेर काढण्याच्या प्रक्रियेमुळे फ्रिजमधील थंडावा टिकून राहतो.

Refrigerator

|

sakal

दररोज योगा करता येत नाही? मग ‘इतके’ दिवस नक्की करा

yoga

|

Sakal

येथे क्लिक करा