Puja Bonkile
शरीरात ब्लड शुगर वाढणे शरीरासाठी घातक ठरू शकते.
यामुळे शरीरा संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
चुकीची जीवनशैली आणि योगाचा अभाव यामुळे ब्लड शुगरचे प्रमाण वाढत चालले आहे.
ज्या लोकांच्या शरीरात ब्लड शुगरचे प्रमाण जास्त असते त्यांची किडनी डॅमेज होऊ शकते .
मधुमेहाचे प्रमाण जास्त असल्याने हार्ट अटॅकचे प्रमाण वाढू शकते.
शरीरातील रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यास रक्ताभिसरण सुरळित होत नाही.
मधुमेहाच्या लोकांना डोळ्यासंबंधित आजार उद्भवू शकतात.
शरीरात ब्लड शुगरचे प्रमाण वाढल्यास संसर्गजन्य आजार वाढू शकतात.
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी योगा करावा. तसेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.