साप चावला तर मुंगसाचं पुढे काय होतं?

संतोष कानडे

साप

साप आणि मुंगसाचं वैर पूर्वापार आहे. आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी मादी मुंगूस सापावर हल्ले करते, प्रसंगी त्याचा जीव घेते.

मुंगूस

परंतु साप आणि मुंगूस या दोघांच्या लढाईमध्ये जर सापाने मुंगसाचा चावा घेतला तर मुंगसाचं काय होतं? असा प्रश्न सर्वांना पडला असेल.

विष

तज्ज्ञांच्या मते मुंगसाच्या शरीरामध्ये असेकाही घटक असतात, ज्यामुळे विषाचा परिणाम त्याच्यावर होत नाही.

संरक्षण

अत्यंत विषारी सापांपासूनही मुंगूस आपलं संरक्षण करु शकतं. सापाच्या विषात अल्फा-युरोटॉक्सिन असतं. त्यामुळे चेतासंस्थेकडून येणारे संदेश रोखले जातात.

अर्धांगवायू

या विषयामुळे अर्धांगवायू होऊ शकतो किंवा मृत्यू येऊ शकतो. मात्र मुंगूसाच्या शरीरामध्ये सापाच्या विषाला टक्कर देण्याची क्षमता असते.

संदेश

मुंगसाच्या शरीरात असलेल्या अॅसेटिलकोलीन रिसेप्टरमध्ये झालेल्या बदलांमुळे त्यांच्या स्नायूंपर्यंत संदेश पोहोचतात त्यामुळे मुंगसाचा जीव वाचतो.

मुंगूस मरु शकतं

मात्र कधी कधी मुंगसाचा जीव विषामुळे जाऊ शकतो. अत्यंत विषारी किंवा मोठा साप असेल आणि मुंगसाच्या शरीरात भरपूर विष गेलं असेल तर मुंगूस मरु शकतं.

लढाई

मुंगूस आणि सापाच्या लढाईमध्ये जास्तवेळा मुंगूसच जिंकतं. परंतु कोब्रोबरोबर मुंगूस जिंकेलच असं नाही.

नियंत्रण

मुंगसांमुळे सापांची संख्या नियंत्रणात राहण्यास मदत होते. मुंगसाच्या एका फटक्यात साप मरु शकतो, इतकी शक्ती त्याच्यात असते.