Mansi Khambe
आजकाल स्मार्टफोनमधून फोटो काढताना एखादा फोटो ब्लर आला, तर अनेक जण लगेचच आपल्या शर्टने किंवा रुमालाने कॅमेऱ्याची लेन्स पुसतात.
Wiping Camera With Shirt
ESakal
कॅमेरा शर्टने किंवा रुमालाने पुसल्यास तात्पुरते साफ होते. मात्र ही सामान्य सवय कॅमेऱ्याच मोठं नुकसान करू शकते. यामुळे तुमच्या फोनच्या कॅमेऱ्याची लेन्स खराब होण्याची शक्यता असते.
Wiping Camera With Shirt
ESakal
कोणतेही कापड कॅमेरा लेन्सवर घासल्यास ते सॅन्डपेपर सारखं काम करतात. यामुळे लेन्सवर स्क्रॅचेस पडले जातात. जे डोळ्यांना दिसत नाहीत, मात्र परिणामी तुमचे फोटो ब्लर आणि खराब होऊ लागतात.
Wiping Camera With Shirt
ESakal
कपडे स्पर्शाला मऊ वाटू शकतात, पण सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास त्यांचे धागे खडबडीत आणि खरखरीत दिसतात. दिवसभरात धूळ आणि सूक्ष्म कण कपड्यांवर जमा होतात. जेव्हा तुम्ही या कणांनी तुमची लेन्स पुसता, तेव्हा हे कण स्क्रॅचेस तयार करू शकतात, जे हानिकारक असतात.
Wiping Camera With Shirt
ESakal
स्मार्टफोनच्या कॅमेरा लेन्सवर एक विशेष अँटी-रिफ्लेक्टिव्ह थर असतो, जो फोटोची स्पष्टता सुधारतो. मात्र कापडाने लेन्स घासल्याने हा थर हळूहळू निघून जाऊ शकतो आणि फोटो अस्पष्ट (ब्लर) दिसू लागतात.
Wiping Camera With Shirt
ESakal
तुमच्या फोनचा कॅमेरा योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही महागड्या साधनांची गरज नसते. लेन्सवरील धूळ हलकीच फुंकर मारून किंवा लहान 'एअर ब्लोअर'चा वापर करून काढून टाकता येते.
Wiping Camera With Shirt
ESakal
लेन्स बोटांनी पुसणे किंवा त्यावर थुंकीचा वापर करणे यांसारख्या सामान्य चुका टाळा. असे केल्यास लेन्सच्या आवरणाचे (coating) नुकसान होऊ शकते.
Wiping Camera With Shirt
ESakal
जर तुम्ही वारंवार प्रवास करत असाल किंवा धुळीच्या वातावरणात काम करत असाल, तर कॅमेरा लेन्स प्रोटेक्टर वापरण्याचा विचार करा. हे संरक्षणाचा एक अतिरिक्त थर म्हणून काम करते, ज्यामुळे लेन्सवर ओरखडे पडणे टळते.
Wiping Camera With Shirt
ESakal
Parrot Life Lessons