भारत-पाकिस्तान फाळणी झाली नसती तर देशात काय बदल झाले असते?

Amit Ujagare (अमित उजागरे)

फाळणी

१९४७ मध्ये इंग्रजांचं राज्य संपलं आणि भारताची फाळणी होऊन भारत, पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे निर्माण झाली.

United India

मोठं नुकसान

पण यामुळं भारताचं अनेक बाबतीत मोठं नुकसान झालं, पण जर ही फाळणी झाली नसती तर आज काय परिस्थिती असती?

United India

विस्थापित

सर्वात पहिलं म्हणजे या फळणीदरम्यान जळपास २ कोटी लोक विस्थापित झाले अन् २० लाख लोकांचे मृत्यू झाले, हे झालं नसतं.

United India

सर्वाधिक लोकसंख्या

भारतात सध्या ७८ टक्के हिंदू, १४ टक्के मुस्लिम आहेत. पण अखंड भारत असता तर लोकसंख्येच हे प्रमाण ६२ टक्के हिंदू, ३२ टक्के मुस्लिम असं असतं. देशाची एकूण लोकसंख्या १७६ कोटी असती, जी जगातील सर्वाधिक लोकसंख्या असती.

United India

घुसखोरी

जर भारत अखंड असता तर तो आजपेक्षा अधिक विविधतेनं नटलेला असता. ईशान्य भारतातील आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांची घुसखोरी कधीच झाली नसती.

United India

भाषेचा प्रभाव

तसंच भारतात ऊर्दू भाषेचं प्रमाणही लक्षणिय राहिलं असतं त्यामुळं हिंदी भाषेचा प्रभाव कमी राहिला असता आणि सरकारी कामकाजात इंग्रजी भाषेचा प्रभाव अधिक असता.

United India

क्रिकेट टीम

भारत-पाकिस्तानच्या दोन क्रिकेट टीम नसत्या. उलट सचिन तेंडुलकर, शोएब अख्तर, विराट कोहली, बाबर आझम हे एकाच भारताच्या टीममध्ये खेळताना दिसले असते.

United India

तालिबानचा उदय

अखंड भारतात जिओपॉलिटिक्सचा विषय मजेशीर असता. कारण १९७०च्या दशकात रशियाविरोधात अमेरिकेनं पाकिस्तानला हाताशी धरुन अफगाणिस्तानात दहशतवादी निपजले नसते, म्हणजेच तालिबानींचा उदयच झाला नसता.

United India

काश्मीरी पंडीत

त्याचबरोबर काश्मीरचा मुद्दाच संपून गेला असता, तिथं वारंवार होणारे दहशतवादी हल्लेच झाले नसते, काश्मीरी पंडितांना विस्थापित व्हावं लागलं नसतं, भारतीय जवानांचे प्राण गेले नसते.

United India

विकास

सध्या पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही देश संरक्षण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत, ती झाली नसती आणि देशाचे ७ लाख करोडो रुपये वाचले असते. त्याचा फायदा अखंड भारताच्या विकासासाठी झाला असता.

United India

आंतरराष्ट्रीय हद्द

भारताची आंतरराष्ट्र हद्द ही अफगाणिस्तान, इराणपर्यंत गेली असती. चीन शेजारचा देश असला तरी तो भारताची अवाढव्य ताकद पाहून नमून राहिला असता.

United India

जीवनमान

अखंड भारतात सध्या पाकिस्तानात राहणाऱ्या लोकांचं जीवनमान खूप सुधारलं असतं. तसंच पाकिस्तानातील आर्थिक, राजकीय अन् सांस्कृतीक स्थिती अधिक भक्कम बनली असती.

United India

धर्मनिरपेक्ष देश

अखंड भारत हा धर्मनिरपेक्ष देश असता तसंच पाकिस्तानवरुन राजकारण्यांचं सुरु असलेलं धार्मिक ध्रुविकरण, प्रोपोगंडा आणि कट-कारस्थानं झाली नसती, तर अफगाणिस्तान किंवा इराणविरोधात मोहिम सुरु झाली असती.

United India

मुद्द्यांवर चर्चा

उलट यामुळं राजकारण्यांना धार्मिक धृविकरणाऐवजी नागरिकांच्या समस्यांवर जास्त चर्चा करावी लागली असती, जे अखंड भारतासाठी खूपच हिताचं झालं असतं.

United India

आर्थिक पॉवर

अखंड भारतात मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक आली असती आणि त्यामुळं देशाची आर्थिक पॉवर वाढली असती. अखंड भारत हा अमेरिका आणि चीनच्या तोडीचा बनला असता.

United India