Mansi Khambe
भारतात दुधाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. पूजाविधीपासून ते पिण्यापर्यंत बहुतेक गोष्टींमध्ये दुधाचा वापर केला जातो. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण मोठ्या आवडीने दूध पितात.
मात्र सध्या दुधाबद्दल अनेक वादविवाद सुरु आहेत. अमेरिकेचा सध्या भारताला मांसाहारी दूध निर्यात करण्याचा विचार करत आहे. परंतु भारताने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
दूध आणि तेही मांसाहारी! शेवटी हे काय आहे आणि हे कसे घडू शकते? तसेच मांसाहारी दूध म्हणजे काय ते जाणून घ्या.
भारतात गाय आणि म्हशीचे दूध पूजेचा तसेच पोषणाचा महत्त्वाचा भाग आहे. भारतीय संस्कृतीत दूध शुद्ध आणि सात्विक मानले जाते. पण अमेरिकेत अशी धार्मिक किंवा सांस्कृतिक विचारसरणी नाही. तिथे पशुपालनाकडे उत्पादनाच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते.
साधारण गाय किंवा म्हशीला दूध देण्यासाठी गवत, धान्य, चारा खाऊ घालतात. मात्र अमेरिकेत गाईला अधिक दूध देण्यासाठी मांस उद्योगातील कचरा देखील दिला जातो.
अमेरिकेत गायींना डुक्कर, मासे, घोडा, कोंबडी खाण्यास दिले जाते. ज्या प्राण्यांपासून ते दूध काढतात त्यांना मांस देखील दिले जाते, म्हणून दुग्धजन्य पदार्थांना 'मांसाहारी दूध' म्हणतात.
अमेरिकेला भारताने आपल्या दुधासाठी बाजारपेठा खुल्या कराव्यात असे वाटते. परंतु भारताने स्पष्ट केले आहे की, ते मांसाहारी आहार दिलेल्या गायींपासून उत्पादित होणारे दूध आयात करणार नाही.
भारत सरकारने अमेरिकेकडे स्पष्ट हमी देण्याची मागणी केली आहे की, हे दूध अशा गायींपासून घेतले जाते ज्यांना मांस, रक्त किंवा प्राण्यांचे अवशेष दिले गेले नाहीत.
हा वाद केवळ व्यावसायिक हितसंबंधांबद्दल नसून सांस्कृतिक ओळख, ग्राहक सुरक्षा आणि नैतिकतेबद्दल आहे. 'मांसाहारी दूध' बद्दल भारताची कडक भूमिका आहे.