'ड्रॅगन फ्रुट' नेमकं काय आहे? एकाच फळातून मिळतात भरपूर फायदे

Monika Lonkar –Kumbhar

फळे

आहारात फळांचा समावेश केल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. फळांमध्ये पोषकघटकांचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे, प्रत्येक सिझनला मिळणाऱ्या फळांचा आहारात अवश्य समावेश करावा. 

Dragon Fruit

ड्रॅनग फ्रूट

बाजारात गेल्यावर एखादं वेगळं दिसणारं काटेरी फळ तुम्ही कधी पाहिलयं का? कदाचित पाहिलं ही असेल. हे फळ बाहेरून दिसायला गुलाबी आणि आतून पांढरे दिसते. ज्यामध्ये काळ्या बिया देखील असतात. या फळाचे नाव आहे 'ड्रॅगन फ्रूट'.

Dragon Fruit

आरोग्यासाठी फायदेशीर

हे फळ दिसायाल वेगळे असल्यामुळे अनेकांना या फळाबद्दल उत्सुकता असते. वेगळे दिसण्यासोबतच याचे आपल्या आरोग्याला होणारे फायदे देखील आश्चर्यकारक आहेत. 

Dragon Fruit

ड्रॅगन फ्रूट काय आहे ?

ड्रॅगन फ्रूट हे जंगली कॅक्टसची एक प्रजाती आहे. ही प्रजाती प्रामुख्याने दक्षिण अमेरिका आणि मध्य अमेरिकेमध्ये आढळून येते. 

Dragon Fruit

जगातील अनेक देशांमध्ये ड्रॅगन फ्रूटची शेती केली जाते. आपल्या भारतातही या फळाची लागवड केली जाते.

Dragon Fruit

ड्रॅगन फ्रूट हे फळ काही स्थलांतरितांच्या मदतीने १९ व्या शतकामध्ये व्हिएतनाम या देशात पोहचले. व्हिएतनाममध्ये या फळाला ‘थान लॉंग’ म्हणजेच ‘ड्रॅगनचे डोळे’ असे ही म्हटले जाते.

Dragon Fruit

व्हिएतनाम

आरोग्यासाठी लाभदायी असणाऱ्या या ड्रॅगन फ्रूटचा सर्वात मोठा उत्पादक आणि सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून आज व्हिएतनामची जगभरात ओळख आहे.

Dragon Fruit

मानसिक आरोग्य कसे राखायचे ?

Mental Health | esakal