Vrushal Karmarkar
महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप केले आहे. मुख्यमंत्र्यांनी गृहखाते स्वतःकडे ठेवले आहे. अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय, तर पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तर हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण खाते दिले आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण खातं देण्यात आले आहे. तसेच दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण खातं देण्यात आले आहे.
मात्र तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्राच्या या तिन्ही शिक्षण मंत्र्यांचे शिक्षण किती आहे? तर आम्ही तुम्हाला सांगतो. या तिन्ही मंत्र्यांचे शिक्षण किती आहे?
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सिव्हील इंजिनियर डिप्लोमा केला आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे शालेय शिक्षण दादर येथील राजा शिवाजी विद्यालय म्हणजेच किंग जॉर्ज शाळेत झाले. त्यांनी फोर्टमधील सिद्धार्थ कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. 1980 मध्ये बी. कॉमची पदवी प्राप्त केली आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी 1974 मध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून बीए ऑनर्स पूर्ण केले आहे.