'इलेक्टोरल बाँड' नेमकं असतात काय ?

सकाळ वृत्तसेवा

इलेक्टोरल बाँड

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, इलेक्टोरल बाँड हे राजकीय पक्षांना देणगी देण्याचे आर्थिक साधन आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया

भारतातील कोणताही नागरिक किंवा कंपनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निवडक शाखांमधून खरेदी करू शकते आणि त्यांच्या आवडीच्या कोणत्याही राजकीय पक्षाला देणगी देऊ शकते.

इलेक्टोरल बाँड मूल्य

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या निवडक शाखांमधून रु. 1,000, रु. 10,000, रु. 1 लाख, रु. 10 लाख आणि रु. 1 कोटींचे कोणत्याही मूल्याचे इलेक्टोरल बाँड खरेदी करता येतात.

किमान एक टक्का मते

लोकसभा किंवा विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत किमान एक टक्का मते मिळालेल्या राजकीय पक्षांनाच निवडणूक रोख्यांद्वारे देणगी दिली जाऊ शकते.

बाँडचा कालावधी

निवडणूक रोखे जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्यात 10 दिवसांच्या कालावधीसाठी खरेदीसाठी उपलब्ध करून दिले जातात,इलेक्टोरल बाँडमध्ये पैसे देणाऱ्याचे नाव नसते.

काळ्या पैशाला आळा

सरकारच्या म्हणण्यानुसार, 'इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून काळ्या पैशाला आळा बसेल आणि निवडणुकीत देणग्या म्हणून दिलेल्या रकमेचा हिशेब ठेवता येईल.