Pranali Kodre
सध्या भारतातील दिल्ली, पुणे, बेंगळुरू सारख्या मेट्रो शहरांमध्ये या फेक वेडिंग्स ट्रेंडमध्ये आहे. GenZ मध्ये तर हा प्रकार खूप लोकप्रिय होत आहे.
अनेकाना आता प्रश्न पडला असेल की फेक वेडिंग म्हणजे नेमकं काय? तर तेच थोडं जाणून घेऊ.
फेक वेडिंग म्हणजे असा लग्न सोहळा, ज्यात नवरा-नवरी नाही, पण लग्नाची सर्व मजा घेता येते.
यामध्ये वरात, वरमाळा, फुलांची उधळण, संगीत असं सर्वकाही असतं, मात्र प्रत्यक्षात कोणाचेही लग्न होत नसते.
याशिवाय फेक वेडिंगसाठी सर्वजण पारंपारिक कपडेही घालून येतात आणि सोहळ्याचा आनंद घेत धमाल करतात.
दरम्यान फेक वेडिंग लोकप्रिय होण्याचे एक कारण म्हणजे यात कोणत्याही भावना जोडलेल्या नसतात, जबाबदाऱ्या नसतात. फक्त लग्नाची मजा (Wedding Vibes) करता येते.
अशा फेक वेडिंगसाठी तिकीटं मिळतात, जी खरेदी करून तुम्ही त्यात सहभागी होऊ शकता.