रोहित कणसे
आपल्यापैकी फ्लाइटमध्ये भरपूर प्रवास करतात त्यांना टर्ब्युलन्स हा शब्द नक्कीच माहिती असेल.
आज 21 मे रोजी सिंगापूर एअरलाइन्सचे विमान म्यानमारच्या आकाशात एअर टर्ब्युलन्स अडकले.
यामध्ये एका 73 वर्षीय ब्रिटीश प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर इतर 30 प्रवासी जखमी झाले.
आज आपण नेमकं हा टर्ब्युलन्स काय असतो आणि तो किती प्रकारचा असतो ते जाणून घेणार आहोत.
जेव्हा उड्डाण करताना हवा अनियंत्रितपणे विमानाच्या पंखांवर आदळते, तेव्हा विमानात एयर टर्ब्युलन्स निर्माण होतो.
या टर्ब्युलन्समुळे विमान वर-खाली होऊ लागते. या टर्ब्युलन्समुळे प्रवाशांना धक्के बसू लागले आहेत.
विमानांना किमान सात प्रकारच्या टर्ब्युलन्स सामना करावा लागतो. बहुतेक वेळा टर्ब्युलन्स हवामानाशी संबंधित असतो.
खराब हवामानात, विजांचा कडकडाट आणि जड ढगांमुळे विमानात टर्ब्युलन्स निर्माण होतो.
तज्ज्ञांच्या मते, क्लिअर एअर टर्ब्युलन्स, थर्मल टर्ब्युलन्स, टेम्परेचर इंवर्जन टर्ब्युलन्स , मेकानिकल टर्ब्युलन्स, फ्रंटल टर्ब्युलन्स, माउंटन वेब टर्ब्युलन्स आणि थंडरस्टॉर्म टर्ब्युलन्स हे टर्ब्युलन्सचे काही प्रकार आहेत.
एअर टर्ब्युलन्समध्ये स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी सीट बेल्ट घालून ठेवणे हा एक चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे.
तुमच्या गर्लफ्रेंडला 'या' गोष्टी कधीच सांगू नका