संतोष कानडे
अनेकांच्या भींतींवर फ्रेम केलेलं इंद्रजाल लावलेलं तुम्ही बघितलं असेल
इंद्रजाल घरात असल्यामुळे समृद्धी येते किंवा शत्रुला जिंकता येतं, असा एक समज आहे
काही लोक सांगतात, इंद्रजाल ही एक जादू आहे. त्यामुळे अनेक गोष्टी सिद्ध करता येतात
साम, दाम, दंड, भेद यापैकी भेद या गाटमध्ये इंद्रजालाचा समावेश होतो, असंही म्हटलं जातं
इंद्रजाल ही एक माया असल्याचंही अनेकांचं म्हणणं आहे. इंद्राने निर्माण केलेली माया, असा समज आहे.
माया किंवा जादू याची अनेक वर्णन अथर्ववेदात असल्याचं बोललं जातं. त्याचा संबंध इंद्रजालाशीही जोडला जातो
मात्र इंद्रजालाबद्दल केवळ गैरसमजूत असून अंधश्रद्धा बाळगल्या जातात, असं सरकारी यंत्रणांकडून सांगितलं जातं
अनेक ठिकाणी इंद्रजाल विक्रीवर प्रशासनाने कारवाईदेखील केलेली आहे
मात्र आज अनेकांच्या घरात इंद्रजाल दिसतं, तेही फ्रेममध्ये. काहींच्या घरात ते सोन्याने मढवलेलं असतं
इंद्रजाल ही एक समुद्री वनस्पती असल्याचं काही सांगतात, अंधश्रद्धा बाळगू नये, असं आवाहनही करण्यात येतं.