May Day कॉल काय असतो? विमान क्रॅश होताना पायलट नेमका काय संदेश देतो?

Amit Ujagare (अमित उजागरे)

सर्व प्रवाशी दगावल्याची भीती

अहमदाबाद-लंडन विमानाला उड्डाणानंतर भीषण अपघात झाला, यात सर्व २४२ प्रवाशी दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मे डे कॉल झाला

१२ जून २०२५ रोजी दुपारी १.३९ मिनिटांनी या विमानानं उड्डाण केलं होतं. पण त्यानंतर काही मिनिटांतच या विमानाच्या पायलटनं जवळच्या ATC ला MayDay मेडे कॉल केला होता.

महत्वाचा संदेश

पण हा मेडे कॉल काय असतो? जो विमान अपघातग्रस्त होण्यापूर्वीचा महत्वाचा संदेश मानला जातो.

आपत्कालिन मेसेज

कोणत्याही विमानासाठी मे डे कॉल हा एक आपत्कालिन मेसेज असतो. हा संदेश पायलट जवळच्या ATC अर्थात एअर ट्राफिक कन्ट्रोलला पाठवत असतो.

केव्हा होतो कॉल

जेव्हा विमान क्रॅश होणार असतं, प्रवाशांच्या जीवाला धोका असतो, विमानाचं इंजिन फेल होतं, विमानाला आग लागते किंवा हवेतच टक्कर होण्याची भीती असते, विमान अपहरणाची स्थिती असते तेव्हा जवळच्या ATCला पायलट मे डे कॉल करतो.

तातडीची मदत

मे डे कॉलचा नेमका अर्थ असतो तातडीची मदत हवी आहे. हा कॉल करताना पायलट रेडियोवर तीन वेळा मे डे....मे डे...मे डे....असं म्हणतो.

प्राधान्य

जेव्हा ATC ला मे डे कॉल मिळतो तेव्हा संबंधित फ्लाइटला पहिलं प्राधान्य दिलं जातं. विमानतळावरील सर्व प्रकारच्या संसाधनांना त्या विमानाच्या मदतीसाठी लावलं जातं.

पॅन पॅन कॉल

यामध्ये इमर्जन्सी लँडिंगची परवानगी, रनवे रिकामा करणं, अॅम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेड तयार ठेवणं याचा समावेश होता. यामध्ये आणखी शब्द असतो त्याला पॅन पॅन कॉल म्हणतात. पण हा कॉल मे डे कॉल पेक्षा कमी गंभीर मानला जातो.