सूरज यादव
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत भारताचं तणावाचं वातावरण निर्माण झालंय. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना मॉक ड्रीलचे आदेश दिले आहेत.
देशात बुधवारी मॉक ड्रील म्हणजेच युद्धजन्य परिस्थितीत आपत्कालीन उपायांचा सराव करण्यात येणार आहे.
मॉक ड्रीलवेळी संभाव्य हवाई हल्ल्यांचा इशारा दिला जाईल. यासाठी विशिष्ट प्रकारे सायरन वाजवण्यात येणार आहे.
हल्ला झाल्यास बचाव कसा करायचा यासाठी सुरक्षेच्यादृष्टीनं नागरिकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
गंभीर परिस्थिती उद्भवल्यास ब्लॅकआऊट म्हणजेच वीज बंद करण्याचा उपाय अवलंबला जाईल.
प्रमुख प्रकल्प, मोठ्या संस्थांसह केंद्राच्या महत्त्वाच्या इमारती, साधने यांचा बचाव करण्याच्या संरक्षण उपायांचा समावेश असेल.
हल्ला झाल्यास आपत्कालीन परिस्थितीत काय करायचं? सुरक्षित कसं रहायचं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.