Old Monk चा जालियनवाला बागेशी काय संबंध? FSSAI कारवाईदरम्यान उलगडलं रहस्य...

Vrushal Karmarkar

ओल्ड मॉन्क

भारतातील सर्वात आवडती आणि लोकप्रिय रम, ओल्ड मॉन्क, सध्या सरकारी नियामक संस्था एफएसएसएआयच्या कठोर कारवाईमुळे आणि तिच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे चर्चेत आहे.

From Jallianwala Bagh to FSSAI Remarkable Story of Old Monk

|

ESakal

अन्न सुरक्षा मानके

एकीकडे,अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन केल्यामुळे तिच्या काही विशिष्ट प्रकारांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

From Jallianwala Bagh to FSSAI Remarkable Story of Old Monk

|

ESakal

इतिहास

तर दुसरीकडे तिचा इतिहास भारताच्या काळ्या पानांपैकी एक असलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाशी जोडलेला आहे.

From Jallianwala Bagh to FSSAI Remarkable Story of Old Monk

|

ESakal

ओल्ड मॉन्कची कहाणी

१७० वर्षांपूर्वी हिमाचलच्या डोंगरांमध्ये सुरू झालेल्या एका छोट्या डिस्टिलरीपासून ते जागतिक ओळख मिळवण्यापर्यंत आणि अलीकडील नियामक कारवाईपर्यंत, ओल्ड मॉन्कची कहाणी खूपच रंजक आहे.

From Jallianwala Bagh to FSSAI Remarkable Story of Old Monk

|

ESakal

ईस्ट इंडिया कंपनी

ही कथा १९व्या शतकाच्या मध्यातील आहे. जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचे भारतावर राज्य होते. ब्रिटिश सैन्य वेगाने विस्तारत होते.

From Jallianwala Bagh to FSSAI Remarkable Story of Old Monk

|

ESakal

हिमाचल प्रदेश

उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या थंड पर्वतीय प्रदेशात लष्करी छावण्या उभारल्या जात होत्या. ब्रिटिश सैनिक आणि अधिकाऱ्यांसाठी वाईन आणि बिअर जहाजाने थेट इंग्लंडमधून आयात केली जात असे.

From Jallianwala Bagh to FSSAI Remarkable Story of Old Monk

|

ESakal

एडवर्ड डायर

एडवर्ड डायर नावाच्या एका सुशिक्षित इंग्रजाने ही लांबलचक पुरवठा प्रक्रिया सोपी आणि कमी करण्याची संधी ओळखली.

From Jallianwala Bagh to FSSAI Remarkable Story of Old Monk

|

ESakal

कसौली

कसौलीचे थंड हवामान आणि नैसर्गिक जलस्रोत ओळखून त्याने ईस्ट इंडिया कंपनीकडून परवानगी मिळवली.

From Jallianwala Bagh to FSSAI Remarkable Story of Old Monk

|

ESakal

पहिली मद्यनिर्मिती भट्टी

एडवर्ड डायर इंग्लंडला गेला. यंत्रसामग्री आणि अभियंते सोबत आणले. १८५५ मध्ये कसौलीमध्ये भारतातील पहिली मद्यनिर्मितीची भट्टी स्थापन केली.

From Jallianwala Bagh to FSSAI Remarkable Story of Old Monk

|

ESakal

मद्यनिर्मितीचा कारखाना

कसौलीमध्ये मद्यनिर्मितीचा कारखाना स्थापन करणाऱ्या एडवर्ड डायर यांचा मुलगा, रेजिनाल्ड डायर, मोठा होऊन ब्रिटिश सैन्यात ब्रिगेडियर जनरल बनला.

From Jallianwala Bagh to FSSAI Remarkable Story of Old Monk

|

ESakal

जालियनवाला बाग

याच जनरल डायरने १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे निःशस्त्र भारतीयांवर अंदाधुंद गोळीबार करण्याचा आदेश दिला होता. या हत्याकांडाने भारतीय इतिहासात ब्रिटिशांचा चेहरा उघड केला.

From Jallianwala Bagh to FSSAI Remarkable Story of Old Monk

|

ESakal

डायर कुटुंब

एडवर्ड डायरने १८५५ मध्ये स्थापन केलेल्या मद्यनिर्मितीच्या कारखान्यातून मिळणाऱ्या महसूल आणि व्यवसायामुळे डायर कुटुंबाचा प्रभाव वाढत गेला. जो पुढे जालियनवाला बागच्या काळ्या अध्यायाशी कायमचा जोडला गेला.

From Jallianwala Bagh to FSSAI Remarkable Story of Old Monk

|

ESakal