फिटनेस आयकॉन शिवाजी महाराज! असा होता त्यांचा शिस्तबद्ध आहार

Sandip Kapde

प्रेरणा

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान योद्धे नव्हते, तर संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणास्थान होते. त्यांच्या जीवनशैलीतून आजही लाखो लोकांना प्रेरणा मिळते.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

पराक्रम

शिवरायांनी आयुष्यात असंख्य युद्धं जिंकली. त्यांच्या पराक्रमाने त्यांना अपराजित योद्ध्याची ओळख मिळाली आणि त्याबरोबरच त्यांनी नेहमीच उत्तम आरोग्य राखलं.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

कुतूहल

शिवाजी महाराज नेमकं काय खात असत, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. त्यांच्या आहारासंदर्भात इतिहासात विविध मतप्रवाह आढळतात.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

संदर्भ

या विषयावर अनेक अभ्यासकांनी संशोधन करून आपापल्या ग्रंथात शिवरायांच्या आहाराचे उल्लेख केले आहेत. त्यामुळे या विषयाचं एक नेमकं चित्र समोर येतं.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

जाणीव

महाराजांनी आरोग्य आणि युद्धकौशल्य यांच्यातील नातं स्पष्टपणे ओळखलं होतं. त्यामुळे त्यांनी आहाराला विशेष महत्त्व दिलं.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

शिस्त

लढाईसाठी ऊर्जा आवश्यक असल्याने त्यांनी आहारावर नेहमी लक्ष केंद्रित केलं. ते स्वतःच्या आहारातही अत्यंत काटेकोर आणि शिस्तबद्ध होते.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

संतुलन

त्यांच्या आहारात ज्वारी, बाजरी, नाचणीच्या भाकऱ्या, दूध, दही, लोणी, आणि तूप यांचा समावेश असे. हा आहार संतुलित आणि पोषणमूल्यांनी भरलेला होता.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

मोहीम

मोहीमेवर जाताना महाराज केळी बरोबर नेत असत, जे लगेच ऊर्जा देणारे फळ मानले जाते. त्यामुळेच सैन्यासोबतही ते याचा पुरवठा करत.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

सैन्य

सैन्याच्या आहारामध्येही महाराजांनी हीच पौष्टिकता जपली. त्यामुळे सैनिकही सक्षम आणि तंदुरुस्त राहायचे.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

इतिहास

इतिहासकार इंग्रजीत सावंत यांनी महाराजांचा आहार स्पष्ट करताना आग्र्याच्या कैदेतील उल्लेख दिला आहे. तेव्हा शिवाजी महाराज सुकामेवा खात आणि दिवसातून एकदाच जेवत.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

मांसाहार

महाराज मांसाहाराला विरोध करीत नव्हते, असं अनेक इतिहासकार सांगतात. सावंत यांचे लेख याचा आधार देतात, जरी याची लेखी नोंद कुठेही मिळत नाही.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

संदिग्धता

मांसाहाराबाबतचा विषय अजूनही ऐतिहासिक दृष्टिकोनातून स्पष्ट नाही. काही पुरावे असले तरी लिखित स्वरूपात ठोस नोंद उपलब्ध नाही.

Chhatrapati Shivaji Maharaj | esakal

350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला पूल आजही अभेद्य

The 350-year-old bridge built by Chhatrapati Shivaji Maharaj, a marvel of ancient engineering | esakal
येथे क्लिक करा