Vrushal Karmarkar
भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या जर्मनीमध्ये आहे. जिथे त्याच्यावर स्पोर्ट्स हर्निया शस्त्रक्रिया झाली आहे. शस्त्रक्रियेनंतर सूर्यकुमार यादव बरा होत आहे.
सूर्यकुमार यादवने स्वतः त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती शेअर केली आहे. यासोबतच त्याने हॉस्पिटलमधील ऑपरेशननंतरचा फोटो देखील शेअर केला आहे.
पण सूर्यकुमार यादवला असलेला स्पोर्ट्स हर्निया आजार म्हणजे नेमका काय आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?
स्पोर्ट्स हर्निया म्हणजे ओटीपोटात किंवा मांडीच्या भागात कोणत्याही स्नायू ताणणे किंवा फाडणे. हा एक वेदनादायक आजार आहे.
हा आजार अनेकदा अशा खेळांमध्ये होतो ज्यात खूप शारीरिक हालचालींची आवश्यकता असते.
क्रिकेट हा असाच एक खेळ आहे ज्यामध्ये खेळाडूंना वारंवार धावत राहावे लागते.
त्याच वेळी शॉट्स खेळताना किंवा झेल घेताना स्नायूंवर वेगवेगळ्या प्रकारचे ताण येतात. गेल्या वर्षी २०२४ मध्ये सूर्यकुमार यादववर स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती.
आता २०२५ मध्ये या खेळाडूला पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करावी लागली. सूर्यकुमार यादव अनेकदा मैदानावर खूप सक्रिय दिसतो.
सूर्यकुमार यादव भारताचा एक चांगला फलंदाज असण्यासोबतच सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानला जातो.