Mansi Khambe
एक काळ असा होता जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने जगातील अनेक देशांवर राज्य केले होते. मात्र नंतर काळ बदलला. कंपनीचे वर्चस्व संपुष्टात आले.
व्यवसाय करण्यासाठी आलेल्या या कंपनीने जगातील अनेक देशांना गुलाम केले, त्यात भारतही एक होता.
सुमारे 200 वर्षे राज्य केल्यानंतर इंग्रजांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला आणि देशाचे दोन तुकडे केले.
मात्र, आता या कंपनीचे मालक कोण? आता ही कंपनी काय करते? असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का?
जगातील कोणते देश अजूनही या कंपनीच्या नियंत्रणाखाली आहेत? तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या या प्रश्नांची सविस्तर आज आम्ही सांगणार आहोत.
ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 रोजी इंग्लंडमध्ये ट्रेडिंग कंपनी म्हणून झाली. याला ब्रिटीश राजवटीकडून व्यापाराचे विशेष अधिकार मिळाले होते.
ज्यामध्ये प्रामुख्याने भारत आणि पूर्व आशियातील देशांचा समावेश होता. व्यापारासाठी आलेल्या या कंपनीचा लष्करी आणि राजकीय प्रभाव हळूहळू वाढू लागला.
भारतात प्लासीच्या लढाईनंतर कंपनीने बंगालचा पूर्ण ताबा घेतला. हळूहळू ही प्रक्रिया संपूर्ण देशात वाढत गेली आणि एक वेळ अशी आली जेव्हा कंपनीने संपूर्ण भारतावर नियंत्रण मिळवले.
मात्र, ज्या गतीने व्याप वाढला त्याच गतीने स्वातंत्र्याची मागणीही वाढत गेली. त्यानंतर ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताची सत्ता काढून घेतली.
याचा अर्थ ब्रिटीश सरकारने या कंपनीची राजकीय आणि लष्करी शक्ती संपवली. सध्याच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर 200 वर्षे भारतावर राज्य करणाऱ्या या कंपनीचे हक्क 1874 मध्ये पूर्णपणे संपुष्टात आले.
131 वर्षांनी संजीव मेहता यांनी ही कंपनी विकत घेतली. 2005 मध्ये ही कंपनी विकत घेतल्यानंतर त्यांनी कंपनीला लक्झरी चहा, कॉफी आणि खाद्यपदार्थांकडे वळवले.
आज ही कंपनी लक्झरी गिफ्ट आणि लक्सरहॅम चहा, कॉफे बनवते. याशिवाय लक्झरी होमवेअरसह इतर अनेक प्रकारची पेये कंपनीकडून तयार केली जातात.