सकाळ डिजिटल टीम
भारतातील महिलांमध्ये लठ्ठपणा ही एक सामान्य समस्या बनत चालली आहे, विशेषतः एका विशिष्ट वयानंतर वजन वाढण्यास सुरूवात होते.
हार्मोनल बदल, खराब जीवनशैली, पोषणाचा अभाव, आणि तळलेले अन्न खाण्याची सवय मुख्य कारणे आहेत.
महिलांमध्ये शारीरिक हालचालींचा अभाव, व्यायाम न करणे आणि हलके काम करणे टाळण्यामुळे लठ्ठपणा वाढतो.
महिलांचे वजन त्यांच्या उंचीनुसार संतुलित असले पाहिजे.
तुमची उंची सेंटीमीटरमध्ये मोजा आणि 100 वजा करा, उरलेली संख्या म्हणजे तुमचे करेक्ट वजन.
उंची 150 सेमी असेल, तर 150 मधून 100 वजा करा. 50 रहातात तर ते तुमचे बरोबर वजन असेल.
जर कुटुंबात मधुमेह, हृदयरोग किंवा कर्करोगाचा इतिहास असेल, तर वजन अधिक काटेकोरपणे नियंत्रित केले पाहिजे.
अशा परिस्थितीत, तुमच्या वजनापेक्षा 5 ते 6 किलो कमी ठेवणे अधिक चांगले आहे.
महिलांनी नियमितपणे त्यांचे वजन नियंत्रित करणे आवश्यक आहे, जेणेकरून आरोग्याच्या समस्यांपासून बचाव होईल.