व्हॉट्सॲप डीपी कसा असावा? कसा असू नये? वाचा

Amit Ujagare (अमित उजागरे)

सध्याच्या घडीला आपल्याला एकही माणूस असा सापडणार नाही जो व्हॉट्सअॅप वापरत नाही.

व्हॉट्सअॅपचे अनेक फायदे आहेत ज्यामुळं हे अॅप सर्वाधिक लोकप्रिय अॅप बनलं आहे.

पण व्हॉट्सअॅपवर डीपी कसा असावा? याबाबत अनेकांना संभ्रम असतो. डीपी कसा असावा? हे पाहुयात.

डीपीला कधीही देवाचे फोटो लावू नयेत. कारण असे फोटो लावून आपण एखाद्या व्यक्तीला मेसेजद्वारे वाईट भाषेत बोलत असू तर त्यातून काय अर्थ निघेल?

मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे फोटो वापरु नयेत, त्यामुळं नेमकं कोण हा मेसेज करतोय हे समोरच्याला कळणार नाही.

व्हॉट्सअॅप डीपीला लग्नाचे फोटो ठेवू नयेत. कारण दोन वर्षांपूर्वीच लग्न झालेलं असेल आणि पुन्हा तोच फोटो डीपीला ठेवलात तर पुन्हा लग्न केलं असेल असं वाटू शकतं.

त्याचबरोबर आपल्या पार्टनरचे फोटो डीपीला लावू नयेत कारण त्यामुळं समोरच्या व्यक्तीला आपण नेमंक पुरुषाशी बोलतोय की महिलेशी हेच कळणार नाही.

त्याचबरोबर फक्त हाताचा, पायाचा, केसांचे, कानाचे, मागच्या बाजूनं काढलेले फोटो लावू नयेत. यातून तुमचं व्यक्तीमत्व समोरच्याला कळणार नाही.

तसंच खाली बघताना सेल्फी काढलेले फोटो वापरु नयेत कारण अशा फोटोंमध्ये तुमच्या नाकपुड्यांच्या आतला भाग तसंच हनुवटीच्या खालचा भाग दिसतो.

बर्म्युडा घातलेले तसंच भंकस करणारे कोट्स असलेले डीपी ठेवू नयेत. अतिशहाणपणा लोकांना आवडत नाही.

एखाद्या प्रसिद्ध ठिकाणी गेलेलो नसतानाही तिथले फोटो डीपीला लावल्यास ते बालिशपणाचं वाटतं.

तसंच प्रसिद्ध अभिनेता किंवा अभिनेत्रीचे फोटो आपण लावतो. त्याचबरोबर आपला चेहरा चांगला दिसण्यासाठी फोटो एडिट करुन कलर एनहान्स करुन वापरतो. पण ते ही चुकीचं आहे. कारण तुमचा खरा चेहरा समोरा समोर पाहिल्यानंतर लोकांचा अपेक्षाभंग होऊ शकतो.

त्यामुळं डीपीला आपलाच फोटो असावा. त्यातही फक्त चेहरा किंवा डोक्यापासून कमरेपर्यंतचा किंवा पूर्ण कपडे घातलेल्या अवस्थेतील फोटो आणि तोही थोडासाच एडिट केलेला असावा. यामुळं समोरच्याला तुम्ही प्रोफेशनल वाटाल.

पण जर तुम्हाला स्टायलिश फोटो ठेवावाच वाटत असेल किंवा एखाद्या इव्हेंटचा किंवा ठिकाणाचा फोटो ठेवावाच वाटत असेल तर तो शक्यतो तुमच्या स्टेटसला ठेवा. कारण तो किती जणांनी पाहिला हे ही तुम्हाला कळेल अन् तो चोवीस तासांत आपोआप नष्टही होऊन जाईल.