Mansi Khambe
सलूनमध्ये केस कापल्यानंतर जमिनीवर पडलेले केस अनेकदा कचऱ्यात टाकले जातात.
Reused of cut off hair
ESakal
मात्र, गुरुग्राममधील एका संस्थापकाने या वाया जाणाऱ्या केसांचा असा उपयोग शोधून काढला आहे, ज्याची फार कमी लोकांनी माहिती आहे.
Reused of cut off hair
ESakal
सलूनमधील केस फेकून देण्याऐवजी त्यापासून विशेष चटया बनवत आहेत. या चटयांचा वापर सांडपाणी आणि गटारांमध्ये केला जात आहे. जाणून घेऊया या केसांच्या चटया कशा उपयोगी पडतात.
Reused of cut off hair
ESakal
सलूनमधील कापलेले केस एकत्र करून स्वच्छ केले जातात आणि मग चटया बनवल्या जातात. या चटया सांडपाणी आणि गटारांमध्ये वापरल्या जातात. यामुळे सलूनमधील कचरा कमी होतो आणि पुनर्वापर करणे शक्य होते.
Reused of cut off hair
ESakal
केसांमध्ये तेल आकर्षित करण्याचा गुणधर्म असतो. त्यामुळे केसांच्या चटया तसार करून त्या घाणेरड्या पाण्यात ठेवल्या जातात. यावेळी त्या तेल, चिकटपणा आणि इतर अशुद्ध गोष्टी शोषतात.
Reused of cut off hair
ESakal
तथापि, केवळ ह्या चटया पाणी पूर्णपणे स्वच्छ करत नाहीत; ही पाणी स्वच्छ करण्यास मदत करणारी एक पद्धत आहे.
Reused of cut off hair
ESakal
या कल्पनेची गुरुग्राममधील एका नाल्यातही चाचणी घेण्यात आली. चाचण्यांमध्ये पाण्याच्या गुणवत्तेत काही सुधारणा आणि काही प्रदूषकांच्या पातळीत घट झाल्याचे दिसून आले.
Reused of cut off hair
ESakal
ही संस्था सांगते की ते या उद्देशासाठी ७०० हून अधिक सलूनमधून केस गोळा करत आहेत. सलूनमधील केस कचऱ्यात टाकण्याऐवजी, त्यांचा वापर चटया बनवण्यासाठी केला जातो.
Reused of cut off hair
ESakal
अशा प्रकारे, दररोज निर्माण होणाऱ्या केसांचे एका नवीन गोष्टीत रूपांतर होते. हा दृष्टिकोन कचरा कमी करणारा आणि पर्यावरणासाठी फायदेशीर ठरू शकतो.
Reused of cut off hair
ESakal
घाणेरड्या पाण्यात वापरल्यानंतर त्यात साचलेल्या घाणीच्या प्रकारानुसार त्याची विल्हेवाट लावली जाते.
Reused of cut off hair
ESakal
Sea And Rain Water Taste
ESakal