Sandip Kapde
शिवरायांनी राजकीय कर्तव्य आणि नैतिकता यांची सांगड घातली.
स्त्रिया आणि लहान मुलांसाठी त्यांनी उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून दिले.
जीविताचा अधिकार म्हणजेच उदरनिर्वाहाचा अधिकार हे शिवरायांनी मान्य केले.
जिजाऊ आणि शिवरायांनी वृद्ध कलावंतीण मता हिला इनाम दिले.
त्या स्त्रीला त्यांनी अर्धा चावर वावर इनाम स्वरूपात दिला.
लहान मुलांच्या उदरनिर्वाहासाठी शिवरायांनी दूध-भात वतन सुरू केले.
या वतनामुळे लहान मुलांना जगण्यासाठी साधन उपलब्ध झाले.
स्त्रिया आणि लहान मुलांची प्रतिष्ठा जपणे हे त्यांचे ध्येय होते.
त्यांनी स्त्रिया व मुलांना जीविताचा व वित्ताचा अधिकार दिला.
हे कार्य शिवरायांनी आपले नैतिक कर्तव्य मानले.
थोडक्यात शिवरायांनी नैतिकता आणि कर्तव्य यांची यशस्वी सांधेजोड केली.