Amit Ujagare (अमित उजागरे)
'तू न जा, मेरे बादशाह...' हे गाण तुम्ही ऐकलंच असेल 'खुदा गवाह' नावाच्या बॉलिवूडचा सिनेमातील हे गाणं आहे.
या सिनेमातील हिरॉईन श्रीदेवीनं अफगाणिस्तानात मोठी लोकप्रियता मिळवली होती. याच लोकप्रियतेचा भन्नाट किस्सा आहे.
नव्वदच्या काळात सोव्हिएत रशियाच्या सैन्यानं अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेतल्यामुळं तिथले अतिरेकी गट अॅक्टिव्ह झाले होते.
अमेरिकेनं या अफगाणी अतिरेक्यांना रशियाच्याविरोधात लढण्यासाठी शस्त्र पुरवली होती.
अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष नजीबुल्ला हे महानायक अमिताभ बच्चन यांचे मोठे फॅन होते. खुदा गवाह सिनेमाचं शुटिंग त्यावेळी अफगाणिस्तानात होणार होतं. त्यामुळं ते खूश होते.
बच्चन यांच्याबरोबरच अभिनेत्री श्रीदेवी देखील अफगाणिस्तानात प्रचंड फेमस होती. श्रीदेवीची एक झलक दिसावी म्हणून अफगाण तरुण वेडे होत होते.
अफगाणिस्तानात 'खुदा गवाह' सिनेमाचं चित्रिकरण ज्या भागात सुरु होतं, तिथं जर अतिरेक्यांची धुमश्चक्री सुरु असेल त्याचवेळी जर श्रीदेवीचं नाव कोणी उच्चारलं तर ते गोळीबार थांबवायचे असा किस्सा सांगितला जातो.
खुदा गवाह हा अफगाणिस्तानात सर्वाधिक पाहिला गेलेला आजही एक सुपरहिट सिनेमा आहे. तो ही हिंदी भाषेतला, स्थानिक पश्तून भाषेतला नव्हे.