सकाळ डिजिटल टीम
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. बॉलिवूडचे शहेनशहा, बिग बी, अँग्री यंग मॅन यासारख्या असंख्य नावांनी त्यांना ओळखले जाते.
जात विचारल्यावर अमिताभ यांना काय वाटतं? त्यांनी ‘कौन बनेगा करोड़पति 16’ मध्ये यावर प्रतिक्रिया दिली.
कोलकाताच्या युबासना कापस हॉटसीटवर बसल्या होत्या. यांनी समाजशास्त्राच्या अभ्यास करत आहेत हे सांगत असताना त्यांनी जाती व्यवस्थेचा कसा त्रास होतो याबद्दल बोल्या.
हे ऐकून अमिताभ बच्चन म्हणाले, जातिवाद अजूनही अस्तित्वात आहे. हे पाहून वाईट वाटते.
अमिताभ यांनी सांगितले की, जेव्हा जात जनगणना अधिकारी येतात ते सर्व माहिती घेतात त्यात ते जात कोणती असे विचारतात यावर मी त्यांना सांगतो माझ्या वडिलांनी मला कधीही जात सांगितली नाही.
जात जनगणनाची टीम म्हणते, काही तरी लिहावे लागणार आहे. तेव्हा मी जनगणना अधिकाऱ्यांना सांगतो 'इंडियन' लिहा. जात व्यवस्था बदली गेली पाहिजे.
अमिताभ यांचे स्पष्ट मत आहे जातिव्यवस्था संपली पाहिजे.